संपूर्ण आयुष्य संगीनीसोबत
घालवल्यावर,
आज
ती
नसतांना
झालेली
अवस्ता….
वापरलेले
शब्द
... अनुभवलेले
भाव….!
नव अंकुरत्या वेलीची
कधी पालवी तीच झाली
जगली नाही वेल जरी
कित्येक उन्हे न्हाली
…
कधी असंख्य पाखरांचा
आसरा तीच झाली
कधी खोप्याच्या ठोक्यांना
प्रतिसाद तीच झाली
…
कित्येक पोर्णीमांची
कधी साक्ष तीच झाली
…
तेंव्हा चंद्राची किरणेही
ती घोट घोट प्याली
…
सुगम देखाव्यांची
कधी साद
तीच झाली
कधी भरगच्च मैफिलीची
एकटी दाद तीच झाली
…
मिणमिणत्या दिव्यांची
कधी वात तीच झाली
…
कधी धगधगत्या होळीच्या
रंगात रंगून न्हाली
…
सुख दुःखाचे
साटेलोटे
कधी तीच मध्यात आली
सावरोनी लीला आज निघाली
होती पिले पंखान खाली
…
जप माळेच्या
हस्तकाची
कधी तीच मध्यमा
झाली
सुन्या अंगठयास
साथ तिची
कित्येक तपं
झाली …
हाक देउनि स्वर्गातून ती
कधी मनी विलापित आली
…
जणू अजाणातेच्या पै
पाशातून
एक मुक्त वाट झाली
…
जणू अजाणातेच्या पै
पाशातून
एक मुक्त वाट झाली
…
................................................. ललित
No comments:
Post a Comment