Tuesday, June 25, 2013

कधीकधी होते असे..... :


    कधी कधी पाण्याला सुध्धा दाखवावं लागत, कि तुला कुठे वाहायचे आहे... तसेच माणसाच्या विचारांचे असते... कधी कधी स्वतःलाच समजवावे लागते, कि विचारांची दिशा कोणती हवी ते. शेतातल्या विहिरीचा पंप जसं बंद पडल्यावर चिखल आणि शेणाचा दटटा देतात, नंतर पाण्याचे आमिष देतात आणि लगेच मोटर पाणी द्यायला लागते.... तसेच विचारांचे असते. एखाद्या व्यक्ती जवळ विचारांची विहीर असते... त्यातले विचार बाहेर येण्या साठी एक तर मंथन करावे लागते नाही तर दुख आणि तिरस्काराचा दटटा देऊन, बाहेरून काही नवीन विचारांचे आमिष द्यावे लागते. त्यामुळे विहिरीतील विचारांना वाचा फुटते... मार्ग मिळतो... आणि धो धो वाहू लागतात.... आपल्या सोबत आलेला गाळ, माती, पाणी सर्वकाही एक कुंडात साचवून त्या विचारांना शांत होण्याही वाट बघावी लागते... गाळ माती खाली बसले कि पातळीवर राहतात फक्त नी फक्त शुद्ध विचार.... 

    कधी कधी आपल्याच हक्काच्या माणसां कडून स्वतःची अवहेलना करून घेणे आणि नंतर आलेल्या मनाच्या विचारांच्या भरत्याला योग्य दिशा मिळणे हे काळाचे एक गणितच आहे. हे ज्याला समजले ती व्यक्ती प्रेम,मैत्री,नाती या पलीकडे जाऊन फक्त माणूस धर्म जाणतो...आणि आपल्या विचारांनी सर्वांच्या आयुष्याचे चांगले कसे होईल याचाच विचार करतो....अर्थात ज्यांच्या कडून अवहेलना करून घेतो, त्यांच्या मनातील साचलेला गाळ तर तो काढतोच , पण त्या मुळे त्या समोरच्या व्यक्तीचे नेहमी हितच असते... कारण कसे का होईना, हक्काच्या माणसांच्या मनातील वाईट विचार बाहेर पडून, त्यांना सुध्धा नवीन दिशा मिळते... नवीन काहीतरी शिकायला मिळते... या पलीकडे जगणे म्हणजेच जगणे...


...... ललित !

No comments:

Post a Comment