विसरु कसा शकतो
तुझ्या सोबतचे ते क्षण
न जाणवता जाणवनारे
पहिल्या प्रेमाचे लक्षण ...........
विसरु कसा शकतो
तुझ्या श्वासातिल गारवा
सहवासानेच तुझ्या मात्र
झाला घायाळ हा पारवा .........
विसरु कसा शकतो
तुझे ते लाजणे
मधेच कुठे रुसणे
हळूच गालात हासणे .......
पुन्हा जेव्हा भेटली होतीस
तेव्हा तू तशीच होतीस
माझ्या मनातील प्रीती तू
डोळ्यात तशीच जपली होतीस......
शब्द तुझ्या मनातले
ओठांवर जरी येत नव्हते
डोळे मात्र सारकाही
काळजा परी बोलत होते .........
काहीच न बोलता
पुन्हा तू निघून गेलीस
कधीही न भेटण्याचे
वचन मात्र घेउन गेलीस ............
ललित.....
kya bat he mister,,,
ReplyDeleteitna santy santy...
but gud nice one...
vese ek question he ye original he kya mere writer frnd????
yes, these are original , you will fine more than these in my personal dairy ....
ReplyDelete