Tuesday, September 15, 2009

पाखरू.........

माळ रानात पाखरू
सैर वैर धावत होत
थंड थंड वा-यावर
जणू तहान भागवत होत....

मधु घेउन या फुलाचे
त्या फुलावर जात होत
फुलांसोबत जणू काही ते
सारीपाट खेळत हो ....

काय म्हणावे या पाखराला
कसा झुंजूमुंजू झाला
पंख फिरवित हवेत
अंग देई पवनाला .....

कशाची हो तुम्हा चिंता
म्हणत असे हर जिवाला
मज सारखी घ्या भरारी
उंच उंच गगनाला .....

खुटपुटा सोडा मनाचा
हा संदेश मी आणला
दर वेळी हसत राहा
हा सल्ला हो पाखराचा .....

ललित .....


No comments:

Post a Comment