हा गंध रात राणीचा
माळरानात दरवडला
वारा हळूच येउन
कानी माझ्या बडबडला |
थंड थंड पवनाचा
स्पर्श अंगाला जाहला
गेल्या घटिकेचा मला
श्रावण आठवला |
'त्या' गेल्या श्रावणात
तिची चुरस पाहणी
घायाळ करून गेली
माझा काळीजमणि |
धरा मिळू पाहे नभाला
असा क्षितिज जाहला
संगे बसून बसून
इन्द्रधनुष्य पाहला |
सात रंगाच्या नभाने
स्वप्न उद्याचे रंगले
विश्वामित्राच्या मनाला
जणू तिनेच भंगले |
मोर-कोकिळीची गाणी
पडत होती ग श्रवणी
क्षणात येउन गेल्या
फक्त तुझ्या आठवणी |
ललित ....
No comments:
Post a Comment