Tuesday, September 15, 2009

अडीच अक्षरे.....!



हृदयाच्या कुलुपाची तर
किल्लीच आज हरविली
मन बेचैन बेचैन झाले
अन सांज ती आठवली
काळ्याभोर केसातून
किरण येत होते
क्षणात वाटे जणू ते
सुवर्ण वेचीत होते
नजरेच्या तिरकस कोपर्यातुन
ती माला निहाळात होती
काळालेच नाही माला तर
ती डोळ्यांची भाषा होती
मानत भावनांची
गर्दीच एवढी होती
हसून ती केव्हाच गेली
वाटे ती तिथेच होती
काय सांगू सख्यान्नो
गत काय झाली होती
उगवत्या तारकान्तुन
सतत ती आठवत होती
पुन्हा एकदा ओढ़ लागली
'त्या' एका नजरेची
तहानलेल्या चतकास जाशी
चाहुल येत्या बरखेची
मनाच्या पड़द्यावरचा
तो चेहरा नाही सरला
अडीच अक्षरे बोलण्या आधीच
'प्र' नाही उरला।
ललित .....

No comments:

Post a Comment