कंठात दाटोनी आला
आकांत जीवनाचा
टोह फुटण्यासाठी
अवकाश नाही आता
महालात राहणार्यांना
जाणीव कशी कुणाची
झोपडीत राहणार्यांना
नशिबी फुलं तृणाची
ठेउनी भूक पोटी
भरली चोच पिलाची
अमिरांना काय हो
जाणीव या शिलाची
अमीरी- गरिबिचा तर
खेळ हा पुराणा
दैवाने वाहलेला
कसला हा नजराणा
अजुनी सुरु आहे
हा खेळ सावल्यांचा
जीवन आहे काय
बाजार बाहुल्यांचा ...
बाजार बाहुल्यांचा ...|
लालित ..
No comments:
Post a Comment