मनात एक हूरहूर उठली
गाव माझे सोडतांना
ओठांवरती थरथर झाली
"येतो आता " म्हणतांना
डोळे थोडे डबडबलेले
पुढची वाट धरतांना
काळजाचे हि पाणी झाले
सर्वांस नमन करतांना
सख्यांना जेव्हा मिठी घातली
भेटू पुन्हा म्हणतांना
उर कंठात दाटला
पाठ तिकडे करतांना
माय-पित्याचे चरण धरिले
नजर जरा चोरतांना
माथ्या वरती हात ठेपले
आवंढा आत गिळतांना
धक्लीची तर गोष्टच वेगळी
"ये दादा " म्हणतांना
रडत रडत हस्त होती
पूजा माझी करतांना
गाव सारा जमला होता
"परत ये" म्हणतांना
गत आशी झाली होती
माझे गाव सोडतांना...
गत आशी झाली होती
माझे गाव सोडतांना...
ललित .....
No comments:
Post a Comment