अशाच एक उन्हा काळी
बसलो होतो झाडा खाली
मन सारे शून्यात होते
भयाण होती सृष्टी सारी
हळूच वाऱ्याचा झुरूक आला
केस उडवीत सारून गेला
जाता जाता मागे आपुल्या
भोवरा थोडा फिरवुनी गेला
शुन्न्या मधले मन सारे
भोवऱ्या मध्ये फिरून गेले
फिरता फिरता चित्त सारे
वार्या मध्ये विरून गेले
गर..गर..गर..गर
..गर..गर ,,गर,,गर
भोवरा चांगला फिरू लागला
राना वनात, डोंगर माथ्यावर
हळूच आता, चढू लागला
तृणाचे कोवळे धागे उपटून
घट्ट मन बंधू लागला
अभेद्य आशा एका चढणीवर
पुढे पुढे सरू लागला
दगड माती चार सारा
घेऊन वावटळ होऊ लागला
कशाचीही न चिंता करता
स्वैर आता फिरू लागला
फिरता फिरता काय झाले
घट्ट धागे सैल झाले
शंखा सारखा भोवरा तो
क्षीण होऊन लोळू लागला
फिरणे आता मंद झाले
सर्व काही गळून गेले
गर्र..गर्र फिरणारे मन सुध्धा
माझ्या कडे पळून आले
नाही होता वेग आता
नाही होता प्राण
भिर्की घेऊन वाटे
त्याने उगाच घेतला ताण
उरले आता काहीच नव्हते
सरले काही तिथेच होते
धागे, तृण,दगड माती
ढीग होऊन बसले होते
फिरणारा भोवरा आता
कधीच तत्वत विरून गेला
"हेच जीवन नाहीई तर काय ?"
एक विचार मनात
फिरून गेला…..!
(माझे तात्पर्य : हि कविता, फक्त कविता नसून माणसाचा जीवन प्रवास आहे. हा प्रवास शुन्या पासून सुरु होतो आणि हळू हळू गती घेतो. माणूस मोठा होतो त्याच्या कर्माने, चिकाटीने तो कुणाचेही ऐकत नाही. पण जस जसा वृधोप्काल जवळ येतो त्याची कर्मठता, क्षmता कमी कमी होते. तो जीर्ण होतो ...परिणामी लयास जातो.आणि पुन्हा उरते ते फक्त शून्य. यालाच जीवन म्हणतात !!! )
ललित...
No comments:
Post a Comment