Thursday, February 16, 2012

**** ती ****

असेलही कुठेतरी मला "माझे" म्हणणारी
गोरा रंग अंगावर, व गालात खडी असणारी
लाल ओठांचे स्मित घेऊन,यावी ती सामोरी
काळजाशी चाळा करत, बाहुली घेऊन फिरणारी
पाणावलेल्या नयनांनी, तिने असे पाहावे
नजर बंद होताच माझी, हळूच मिठीत यावे
गरम उसासे अंगाला, स्पर्श करून जावे
रोमांची शाल बनून, उठून उभे राहावे
आसुसलेल्या बाहूंनी तर, घट्ट वळण घ्यावे
मना उंच करून आकाशी, घोट घोट प्यावे
क्षणात नजरेचा तीर सुटावा, घायाळ मी व्हावे
असेल ती माझी तरी, मी वळून वळून पहावे
बहर येत प्राजक्ता ला, फुल जसे मिळावे
वेळ अजून आली नाही हे बाध कसे पाळावे
अजुनी तिला न पाहता, स्वप्नात ती यावी....
अजुनी तिला न पाहता, स्वप्नात ती यावी...
दैवाच्या स्वप्नाकाराने का अशी मजाक करावी ?

ललित...

No comments:

Post a Comment