चोहो बाजूनी दाटला
आज काळोख काळोख
धरती कशी फाटली
खंडी पडला खडक
ज्वाळ येऊ करी वर
धावले सारे पामर
हाहाकार धरणीचा
त्याला नव्हती वो वाचा
दही दिशा थरारल्या
जसं तांडव शंभूचे
आग ओकीत होता
जसा म्ह्शासुर आज
झाड रोप हो तुटली
जशी वीज कडाडली
जीवावर का उठली
प्रकोपाची हि सावली
पाखर गाडून पडली
घर उडून हो गेली
कारणी कशी घडली
निसर्गाच्या माउलीची...
ललित...
No comments:
Post a Comment