Thursday, March 29, 2012

~~~ सोहळा ~~~

सोहळाच होता आज जणू
घरी सगळे जमले होते.

कोपर्यात बसून बसून सारे
अश्रू फक्त ढांळीत होते.

कधीच लोक सोबत नव्हते
पण आज सगळे जमले होते

कधीच वाटयला फुले नव्हती
पण गळ्यात आज हार होते

उंच भरारी घेतांना नेहमी
आई म्हनायची.बाळा
घे भरारी यशाची
पण विचार घे चौघांचा

भीती होती त्या चौघांचीच
शोध घेतला त्यांचा.
आज मिळाले, कोण ते.
उचलत होते रडतांना.

सगळे कमाविले आयुष्यात
घर भरून होते,

जाता जाता शेवटी मात्र
हाथ रितेच होते.

गोड खाल्ले, कडू खाल्ले
पचून गेले अन्न
पण नीतीचा हा खेळ बघा
आज,गीळवेना तुळशी पत्र

झाले गेले ते माफ होते
मन सुध्धा साफ होते.

कळवला हा जीव तेव्हा
मित्र थोडे दु:खात होते.

कळलेच नाही जगता जगता
मरण एव्हडे सुंदर होते.....

कळलेच नाही जगता जगता
मरण एव्हडे सुंदर होते.....

No comments:

Post a Comment